
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची स्टाईल एकदम हटके दिसते आहे. ही छायाचित्रे शेअर करताना राखीने सांगितले आहे की, ती तिच्या फिरंगी मित्रांसह आणि हॉलीवूड स्टार्स सोबत दिसत आहे.

या फोटोंमध्ये राखी तिच्या फिरंगी मित्रांच्या रंगात रंगलेली दिसत आहे. तिचा लूक आणि स्टाईल तिच्या मित्रांसारखीच दिसते आहे.

मात्र, ही छायाचित्रे शेअर करताना राखीने कोणत्या कार्यक्रमाचे फोटो आहेत, हे सांगितलेले नाही. प्रत्येकजण या फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. पोज आणि अॅक्शन हॉलिवूड इव्हेंटसारखे दिसते.

याआधी राखी सावंतने तिची अतिशय ग्लॅमरस चित्रे शेअर केली होती, ज्यात ती पार्टीच्या मूडमध्ये दिसली होती. हे फोटो शेअर करताना स्वतः राखीने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘सिझलिंग’.

राखीचे हे फोटो पाहून काही चाहते मात्र भलतेच संतापले आहेत. राखीची ही स्टाईल काही चाहत्यांना रुचलेली दिसत नाहीये. ‘हीच आपली संस्कृती आहे का?’, असा सवाल चाहते करत आहेत.

'बिग बॉस 14' मध्ये प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करणारी राखी सावंत 'बिग बॉस 15' बद्दलही चर्चेत आहे. राखी सावंतने म्हटले आहे की, तिला पती रितेशसोबत 15व्या सीझनमध्ये जायचे आहे.

'बॉलिवूड लाईफ'ला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत म्हणाली,' मला माझे पती जायचे आहेत. त्याने विचार केला पाहिजे की, त्याने माझ्याशी लग्न केले आहे. मला त्याच्यासोबत बिग बॉसच्या घरात जायला आवडेल.

सलमान खान आणि बिग बॉसने त्याला धडा शिकवावा, अशी राखीची इच्छा आहे. त्याला हे माहित असले पाहिजे की लग्नानंतर कोणीही आपल्या पत्नीला अशा प्रकारे सोडत नाही, असेही राखी म्हणाली.