
रणबीर कपूरच्या 'वास्तू' या निवासस्थानी आज (13 एप्रिल) मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसह विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

आलियाची बहीण आणि अभिनेत्री पूजा भट्टने महेश भट्ट यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी पूजाने तिच्या हातावरील मेहंदी फोटोग्राफर्सना दाखवली.

मेहंदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ग्लॅमरस एण्ट्री केली. करणनेच आलियाला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. आलिया आणि करणची मैत्री बॉलिवूड इंडस्ट्रीत नेहमीच चर्चेत असते.

रणबीरच्या लग्नासाठी त्याची बहीण रिधिमा सहानी मंगळवारी दिल्लीहून मुंबईला आली. मुलगी रिधिमा आणि नातसह नीतू कपूर या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाल्या. यावेळी नीतू कपूर यांनीसुद्धा पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

रणबीर आणि आलियाचा खास मित्र आणि त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी कार्यक्रमाला पोहोचला. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर-आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. रणबीर आणि आलियाला एकत्र आणण्यासाठी अयानचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं.

अरमान जैनच्या पायाला दुखापत झाल्याने तो मेहंदीच्या कार्यक्रमाला जाऊ शकला नाही. तर करिश्मा कपूरने करीनासोबत कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी करीनाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर करिश्माने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला.