
अभिनेत्री राणी चॅटर्जी भोजपुरी सिनेमाची एक चमकणारी स्टार आहे. राणी तिच्या चाहत्यांच्या हृदयावर नेहमीच राज्य करते. नुकतंच राणीने इन्स्टाग्रामवर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत.

तिच्या प्रत्येक चित्रपटाने ती तिच्या चाहत्यांना स्वतःचं वेड लावते. आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी राणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

नुकतंच, राणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे आश्चर्यकारक परिवर्तन दिसून येत आहे.

तिने 2014 आणि 2020 चे तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होते की 7 वर्षात तिने किती वजन कमी केले आहे.

राणी बऱ्याच दिवसांपासून वजन कमी करण्यासाठी जिममध्ये कसरत करत आहे. चाहत्यांमध्ये तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.