
प्रत्येक वेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. त्याचा लूक प्रत्येक वेळी वेगळा असतो, जो चाहत्यांना त्याच्याकडे पाहायला भाग पाडतो. नुकताच रणवीर विमानतळावर स्पॉट झाला होता.

दरवेळी प्रमाणे या वेळीही रणवीरचा एअरपोर्ट लूक स्टायलिश होता. त्याने पिवळ्या रंगाची पँट आणि गुलाबी रंगाची हुडी घातली होती. यासोबतच पांढऱ्या रंगाचा गॉगल घातला होता.

रणवीर त्याच्या आईसोबत विमानतळावर दिसला होता. त्यांनी विमानतळावर छायाचित्रकारांसाठी फोटो पोजही दिल्या. आपल्या सुरक्षेची काळजी घेत रणवीरने मास्क घातला होता.

रणवीर सिंह सध्या त्याच्या टीव्ही डेब्यूच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो बिग पिक्चर या रिअॅलिटी शोद्वारे टीव्हीवर पदार्पण करणार आहे. त्याच्या शोबद्दल बरीच चर्चा सुरु आहे.

दुसरीकडे, त्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तेव्हा रणवीरचा चित्रपट ‘83’ ख्रिसमसच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. त्याआधी तो दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातही दिसणार आहे.