
गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह चर्चेत आहेत. दीपिका आणि रणवीरचे काही तरी बिनसले असल्याचे अनेकांचे म्हणणे असून सतत त्यासंदर्भातील बातम्या पुढे येताय.

इतकेच नाही तर रणवीर आणि दीपिका विभक्त झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, या चर्चांदरम्यान रणवीर सिंहने असे काहीतरी केली की या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट होतंय.

एका दागिन्यांच्या ब्रँडने दीपिकाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. याचेच काही फोटो नुकताच दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे या फोटोंवर रणवीर सिंहने कमेंट केलीये. रणवीरची ही कमेंट पाहून दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झालाय. रणवीरने कमेंट करत म्हटले की, My Queen...

गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिकाच्या नात्यामध्ये सर्व काही व्यवस्थित नसल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, रणवीरच्या कमेंटने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झालंय.