
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) नेहमीच तिच्या खास शैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रिया कदाचित अभिनय जगतापासून दूर असेल, पण ती निर्मिती क्षेत्रामध्ये नक्कीच कमाल करत आहे. सोनम कपूरची धाकटी बहीण रिया कपूर आता तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी (Karan Boolani) याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोनमची बहीण रिया अभिनयापासून लांब असली तरी, ती सोनमपेक्षा कमी नाहीये.

सोनमच्या स्टाईल आणि फॅशनची नेहमीच जास्त चर्चा होते, तर रिया या बाबतीत काही कमी नाहीये.

रियाची फॅशन सेन्स आणि स्टाईल बहीण सोनमसारखीच उत्तम आहे. रिया अनेकदा तिच्या खास स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते.

रिया तिच्या खास स्टाईलनं तिच्या चाहत्यांना वेड लावते.

सोनम कपूरप्रमाणेच रियाची स्टाईलही अनेकदा चाहत्यांच्या पसंतीस उतरते.

रिया कपूर तिच्या वेगळ्या स्टाईलनं तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते.