RJ Mahvash : त्यावेळी त्याला गरज होती, म्हणून मी.. महवशकडून युजवेंद्र चहल सोबतच्या संबंधांवर मोठा खुलासा
RJ Mahvash-Yuzvendra Chahal : अभिनेत्री आणि माजी रेडिओ जॉकी आरजे महवश युजवेंद्र चहल सोबत जे नातं होतं, त्यावर ती मोकळेपणाने बोलली आहे. युजवेंद्र चहल सध्या आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळतोय. धनश्री सोबत घटस्फोटाच्या काळात युजवेंद्र चहल आणि आरजे महवश बऱ्याच वेळा एकत्र दिसले.

त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माध्यमं आणि सोशल मीडियावर चर्चा होती. दोघांमध्ये नेमकं काय नातं होतं? त्या काळात काय घडलं? या बद्दल आता महवश बोलली आहे. युजवेंद्र चहलच्या आयुष्यातील कठीण काळात मी त्यांच्यासोबत उभी होते असं महावश म्हणाली.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत महवश त्यांच्या नात्याबद्दल बोलली. आम्ही फक्त चांगले मित्र होतो. युजवेंद्र चहलचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट होत होता, त्यावेळी मी मैत्रीच्या नात्याने त्याला आधार दिला. युजवेंद्र आणि तिच्यामध्ये झालेल्या वादाबद्दल सुद्धा तिने सांगितलं.

छोट्या-छोट्या गोष्टींवरुन लोकांना मोठी गडबड करण्याची सवय असते. दोन मित्रांमध्ये वाद होतो, तेव्हा ते परस्परांना फॉलो-अनफॉलो करतात. विषय तिथेच संपतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अगदी सहजतेने काहीही बोलू शकता, तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल मनात राग बाळगत नाहीत. त्यामुळे माझ्या त्याला शुभेच्छा आहेत, माझ्या शुभेच्छा नेहमीच त्याच्यासोबत असतील. त्यात फार काही मोठं नाहीय असं महावश बोलली.

मी मैत्रीची खूप कदर करते. त्यावेळी त्याला चांगल्या मित्राची गरज होती. तो आयुष्यातील कठीण काळातून जात होता. जेवढं शक्य होतं, तेवढा आम्ही त्याला सपोर्ट केला असं महवश युजवेंद्र चहल सोबतच्या नात्यावर बोलली.

युजवेंद्र चहलची पंजाब किंग्स टीम सध्या अडचणीत आलं. पहिले सात सामने जिंकल्यानंतर आता सलग सहा मॅचमध्ये या टीमचा पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या टीमचा प्लेऑफचा पुढचा मार्ग खडतर बनला आहे.