
टिव्ही अभिनेत्री आणि बिग बाॅस 14 विजेती रुबिना दिलैक ही कायमच चर्चेत असते. रुबिना दिलैक हिची लहान बहीण ज्योतिका हिच्या हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. रजत शर्मा याच्यासोबत रुबिना दिलैक हिची बहीण सात फेरे घेणार आहे.

ज्योतिकाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये रुबिना दिलैक हिच्या लूक अत्यंत खास होता. रुबिना दिलैक हिने हळदीच्या कार्यक्रमामध्ये सिल्कचा पिवळ्या रंगाचा सूट घातला होता.

पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये रुबिना दिलैक हिचा लूक जबरदस्त असा दिसत होता. मात्र, रुबिना दिलैक हिचा हा सूट अत्यंत महागडा आहे. या सूटसाठी रुबिना दिलैक हिने तब्बल 35 हजार रूपये मोजले आहेत.

इतकेच नाहीतर रुबिना दिलैक हिच्या हातामध्ये दिसत असलेल्या बटवा हा देखील 3500 रूपयांचा आहे. बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमामधील काही खास फोटो रुबिना दिलैक हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रुबिना दिलैक हिच्या सूटची किंमत ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्योतिका हिने हळदीच्या कार्यक्रमामध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची खास ड्रेस घातला होता.