
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्याशी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींचं नाव जोडण्यात आलं. यात ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यासारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. पण बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिचं सलमान खानशी नाव जोडण्यात आलं होतं पण त्याबाबत लोकांना फारशी माहिती नाही.

सलमान खान आणि या अभिनेत्रीचा बिग बॉसच्या माध्यमातून संबंध आला आहे. या अभिनेत्रीचे नाव एली अवराम असे आहे. विशेष म्हणजे ती बिग बॉस या रिअॅलिटी शोची स्पर्धकही राहिलेली आहे.

याच कारणामुळे ती सलमान खानच्या संपर्कात आली होती. एली अवराम ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यूट्यूबर आशीष संचलानी याने मी एली अवरामसोबत नात्यात असल्याचे नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यानंतर आता एली अवराम आणि सलमान खानच्या कथित नात्याची चर्चा होत आहे.

एली अवराम हिचचे नाव कधीकाळी सलमान खानशी जोडण्यात आले होते. बिग बॉसची स्पर्धक असतानाच एली अवराम आणि सलमान खान यांच्यात खास बंध तयार झाले होते. त्यानंतर हे दोघेही नात्यात असल्याची अफवा सुरू झाली होती.

एली अवरामने मात्र या फक्त अफवा असल्याचे सांगत सलमान खानशी माझे कोणतेही नाते नाही, असे तिने सांगितले होते. बिग बॉस शो संपल्यानंतर एली अवराम ही सलमान खानची पार्टी आणि त्याच्या कुटुंबाच्या इतर कार्यक्रमांतही दिसली होती.

सलमान खान आणि माझ्यात चांगले संबंध आहेत.मी सलमान खानला एक चांगला मित्र समजते तसेच मी त्याच्याकडे एक मेंटॉर म्हणूनही पाहते, असे एली अवरामने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.