
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सईनं नुकतंच ‘मिमी’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता सईनं नुकतंच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या वन पिसमध्ये सईनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.

या सेटवर सईचे वेगवेगळे लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सईचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.