
साईराज केंद्रे... याचे व्हीडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. माझ्या पप्पांनी गणपती आणला. हा त्याचा व्हीडिओ तर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता साईराज एका मालिकेत काम करतो आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' या झी मराठीवरील मालिकेत साईराज सध्या दिसतो आहे. या मालिकेत अमोल हे पात्र साईराज साकारतो आहे. मालिकेतील त्याचा कामाचंही प्रचंड कौतुक होतंय.

साईराजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोंची सध्या चर्चा होतेय. आई भाग्यश्री केंद्रे यांच्यासोबतचे साईराजचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

साईराजची रिअल लाईफ आई भाग्यश्री केंद्रे आणि रील लाईफ आई अपर्णा... रिअल आणि रील लाईफ आईसोबतचे खास साईराजचे फोटो...

साईराजचे व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. गाण्याच्या लिरिक्सनुसार साईराजच्या चेहऱ्यावर जे हावभाव येतात. ते नेटकऱ्यांना आवडतात. 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावरचं त्याचं रील व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता तो मालिकेत दिसतो आहे.