
अभिनेता सैफ अली खान - अमृता सिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. सारा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने कमी कालावधीत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

करिअरसोबतच सारा तिच्या लाईफ स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. सारा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा हिच्या बोल्ड अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

प्रसिद्ध कुटुंबातील लेक आणि बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री सारा रॉयल आयुष्य जगते. सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सारा तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.