
अभिनेत्री सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र साराच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

साराने हिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी खास लूक केला होता. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'मेरे यार कि शादी है...' असं अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

पुढे अभिनेत्री अंबानी कुटुंबियांचे आभार व्यक्त करत म्हणाली, 'मी कधीही विसरता येणार नाही अशा आणखी एका रात्रीबद्दल धन्यवाद...'

सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.