
या ऑक्टोबर महिन्यात अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आपल्या दर्शकांसाठी 'सरदार उधम' घेऊन येत आहे. ही एका असाधारण युवकाची न ऐकली गेलेली कहाणी आहे, ज्याच्या आपल्या मातृभूमि आणि इथल्या लोकांविषयी असलेल्या प्रेमाखातर त्याने भारताच्या स्वतंत्रता संग्रामासाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी प्रेरित केलं आहे.

विक्की कौशल अभिनीत सरदार उधम सिंह, अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपट शूजीत सरकारद्वारे दिग्दर्शित आणि रोनी लाहिरी आणि शील कुमार यांच्याद्वारे निर्मित आहे. भारत आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमधले प्राईम सदस्य या ऑक्टोबरमध्ये केवळ अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 'सरदार उधम' पाहता येणार आहे.

प्रतिशोधाची भयकंपित करणारी कहाणी, सरदार उधम या एका वीर व्यक्तिची साहसयात्रा दर्शवतो, ज्याने हे दाखवून दिले आहे की जग आपल्या प्रेमळ देशवासियांच्या आयुष्याला कधीच विसरू नाही. जे 1919 च्या जालियनवाला बाग नरसंहारात क्रूरपणे मारले गेले.

निर्माता रोनी लहिरी म्हणतात की, ‘उधम सिंह यांची देशभक्ति आणि आपल्या मातृभूमिसाठी गहिऱ्या, निस्वार्थ प्रेमला दर्शवणाऱ्या चित्रपटाला बनवणे उत्साहजनक होते. या न सांगितल्या गेलेल्या कहाणीला सादर करण्यासाठी टीमने केलेलया दोन दशकांच्या शोधाला चपखलपणे यात सादर करण्यात आले आहे.’

ते पुढे म्हणालेत, ‘विक्कीने आपल्या संपूर्ण जीवन यात्रेत उधम सिंह यांच्या असंख्य भावनांचे वास्तविक सार समोर आणण्यासाठी अथक प्रयास केले आहेत. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओसोबतच्या शानदार सहयोगासाठी आनंदित आहोत आणि या ऐतिहासिक महाकाव्य कथानकाला वैश्विक दर्शकांसमोर सादर करण्यासाठी रोमांचित आहोत.’