
किंग खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सुहाना तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.

आता देखील सुहाना खान हिने आर्यन खान याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आर्यन खान याचा आज वाढदिवस असल्यामुळे सुहाना हिने भावासोबत एक खास फोटो पोस्ट केला आहे.

आर्यन याला वाढदिसाच्या शुभेच्छा देत सुहाना खान म्हणाली, 'माझा मोठा भाऊ आणि माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा...' सध्या सोशल मीडियावर सुहाना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. एवढंच नाही तर, करण जोहर याच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.

आर्यन खान देखील त्याच्या व्यवसायात व्यस्त असतो. आर्यखान याला अभिनेता म्हणून स्वतःची ओखळ भक्कम करायची नसून, आर्यन याला लेखक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असल्याचं अनेकदा समोर आलं.