
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पठाण चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली


लवकरच पठाण हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. नुकताच शाहरुख खान याने आस्क एसआरके सेशनमधून चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली आहेत.

एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, सर तुम्ही बाॅलिवूड चित्रपटांमधून निवृत्ती कधी घेणार आहात? चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख खान याने खास स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.

शाहरुख खान याने लिहिले की, मी अभिनयातून कधीही निवृत्त होणार नाही. मला बाॅलिवूडमधून हाकलून दिले जाईल..आणि कदाचित तेव्हाही मी पुन्हा एकदम हाॅट होऊन परत येईल.