
बॉलिवूड चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच चर्चेत असतो. विषय कोणत्याही असो सोशल मीडियावर आपले मत मांडताना मागे पुढे कधीच बघत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप सोशल मीडियापासून थोडे दूर आहे.

राजकिय विषयांवर स्पष्ट मत मांडताना काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप कायम दिसत असत. मात्र, यामुळे अनेकदा ते निशाण्यावर यायचे. मात्र, याचा त्यांना काहीच फरत पडत नव्हता.

अनेकांनी अनुराग कश्यपसोबतच त्यांच्या मुलीला टार्गेट करण्यास सुरूवात केली. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट तिचा रेप करण्याच्या धमक्या दिल्या. या सर्वांचा मुलीवर परिणाम झाला आणि तिला थेट पॅनिक अटॅक आला.

अनुराग कश्यपला बऱ्याच वेळा शाहरुख खान याने ट्विटरसंदर्भात काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि थेट सांगितले की, ट्विटर हे तुझ्या कामाचे नसून तू इथे सक्रिय राहू नकोस. इतेकच नाहीतर अनुराग कश्यपला फोन लावून शाहरुख खान याने क्लास लावला होता.

शाहरुख खान आणि अनुराग कश्यपची ओळख ही काॅलेजपासूनच आहे. शाहरुख खान अनुराग कश्यपचा सिनिअर आहे. अनुराग कश्पने सांगितले की, मुलगी आलिया आपला विक पाॅइंट आहे.