
अनीस बाजमी यांच्या 'डबल ट्रिपल' सिनेमात शाहिद कपूर याला सर्वात आधी विचारण्यात आलं होतं. पण काही मतभेद असल्यामुळे शाहीद याने सिनेमा करण्यास नकार दिला. ज्यामुळे अभिनेत्याचं मोठं नुकसान झालं.

'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमासाठी देखील निर्मात्यांची पहिली पसंती अभिनेता शाहीद कपूर याला होती. पण या सिनेमासाठी देखील अभिनेत्याने नकार दिला आणि शाहीद याच्या जागी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची वर्णी लागली.

आनंद एल राय यांच्या 'रांझणा' सिनेमातून अभिनेता धनुष याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमासाठी सर्वात आधी अभीनेता शाहीद कपूर याला देखील विचारण्यात आलं होतं. 'रांझणा' सिनेमासाठी देखील अभिनेत्याने नकार दिला आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं.

'रॉकस्टार' सिनेमाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सिनेमासाठी सर्वात आधी अभीनेता शाहीद कपूर याला देखील विचारण्यात आलं होतं. 'रॉकस्टार' सिनेमासाठी देखील अभिनेत्याने नकार दिला

'रंग दे बसंती' आणि 'बँग - बँग' सिनेमासाठी देखील अभिनेत्याला विचारण्यात आलं होतं. पण या सिनेमांना देखील शाहीद याने नकार दिला. आतापर्यंत शाहीद याला अनेक चांगल्या सिनेमांच्या ऑफर आल्या. पण अभिनेत्याने अनेक सिनेमांना नकार दिला.