
अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे मीरा राजपूत हिची फॅन फाॅलोइंग देखील तगडी आहे. मीरा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते

मीरा राजपूत हिने नुकताच तिचे बोल्ड लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मीरा राजपूत अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

मीरा राजपूत हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मीरा राजपूत हिने बिकिनी घातल्याचे दिसत आहे आणि ती समुद्र किनाऱ्यावर चांगला वेळ घालवत आहे.

मीरा राजपूत हिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या फोटोवर चाहते आता मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी मीरा राजपूत हिने स्टार किड्सबद्दल मोठे विधान केले होते. मीरा राजपूत म्हणाली होती की, मला स्टार किड्स या शब्दाची चिड येते.