
किंग खान... बॉलिवूडचा बादशाह... शाहरूखचा सिनेमा प्रदर्शित झाला की सिनेरसिकांचे पाय आपोआपच थिएटरकडे वळतात. शाहरूखची लेक सुहाना खानने देखील सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.

सुहाना खानचा 'आर्चीज' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर आलेला हा सिनेमा सिनेरसिकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

सुहाना खानचा हा पहिलाच सिनेमा आहे. तिच्या या सिनेमातील कामावर सिनेरसिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणाला हा सिनेमा आवडतोय. तर कुणाला हा सिनेमा आवडत नाहीये.

पहिल्याच सिनेमानंतर नेटकऱ्यांनी सुहाना खानला ट्रोल केलं जातंय. तिच्या ॲक्टिंगची तुलना अनन्या पांडेच्या ॲक्टिंगशी केली जात आहे.

हिच्यापेक्षा अनन्या पांडे परवडली!, असं म्हणत तिच्या कामावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. शाहरूखची मुलगी आहे म्हणून जाऊ दिलं, असंही नेटकरी म्हणताना पाहायला मिळत आहेत.