
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.

‘बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शर्वरी हिने तिच्या करियरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली.

शर्वरी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. विकी कौशल याचा लहान भाऊ सनी कौशल गेल्या अनेक वर्षांपासून शर्वरी वाघ हिला डेट करत आहे.

शर्वरी वाघ हिचा जन्म १४ जून १९९६ मध्ये मुंबई याठिकाणी झाला. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. तर तिची आई नम्रता आणि बहिण कस्तुरी वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत.

शर्वरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.