
शर्वरी फक्त मनोहर जोशी यांची नातच नाहीतर, प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. ‘बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

शर्वरी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. विकी कौशल याचा लहान भाऊ सनी कौशल गेल्या अनेक वर्षांपासून शर्वरी वाघ हिला डेट करत आहे.

शर्वरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

कतरिना कैफ हिची जाऊबाई तिच्यापेक्षाही सुंदर दिसते. पण शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही.