
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.

फोटो पोस्ट करत श्रद्धा हिने खास कॅप्शन देखील दिलं आहे. 'आज संध्याकाळी कोणती ऐतिहासिक गोष्ट पाहाणार आहात...' असा प्रश्न अभिनेत्रीने विचारला आहे.

सांगायचं झालं तर, श्रद्धआ गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. श्रद्धाचं नाव राहुल मोदीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

श्रद्धा आणि राहुल यांनी दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर अधि्कृत घोषणा केलेली नाही. पण दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.