
कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांनी एकत्र नवीन वर्ष (New Year) साजरं केलं. सुट्टीवर असताना दोघेही एकत्र स्पॉट झाले होते आणि आज पुन्हा दोघे विमानतळावर दिसले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करून मुंबईला रवाना झाले आहेत.

यावेळी कियारा कॅज्युअल लूकमध्ये दिसली. त्याने शॉर्ट्ससह सैल टी-शर्ट घातला होता.

कियारानं न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सिद्धार्थसोबत तिनं एकही फोटो काढलेला नाही.

यावेळी सिद्धार्थ मल्होत्राही कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी त्यानं पापाराझींसमोर पोझ दिली नाही.

रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियारानं रणथंबोरमध्ये नवीन वर्ष साजरं केलं.