
असे म्हटले जाते की एकसारखे दिसणारे सात लोक असतात. यात किती सत्य आहे हे आम्ही सांगू शकत नाही, मात्र हो हे निश्चित आहे की काही लोक एकमेकांसारखे दिसू शकतात. आज आम्ही तुम्हाला 'मैं हूं ना' चित्रपटातील गायिका वसुंधरा दाससारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीची ओळख करून देणार आहोत. किरण राठोड असं या अभिनेत्रीचे नाव आहे.

किरण राठोड हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं मोठं नाव आहे. तिने केवळ दक्षिणेतच नाही तर पंजाबी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बाल ब्रह्मचारी हा किरणचा पहिला हिंदी चित्रपट होता.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किरण राठोड ही अभिनेत्री रवीना टंडनची चुलत बहीण आहे.

किरणचा चेहरा मुख्यत्वे गायिका वसुंधरा दास सारखा आहे. दोघींमध्ये एकमेकांची झलक नक्कीच दिसते.

किरण राठोड एक अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री आहे, जी अनेकदा तिच्या सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.