
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने लेहेंग्यामध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते.

सोनाक्षी सिन्हा हिचा लूक तुम्ही देखील कोणत्या लग्न कार्यात किंवा इतर कोणत्या कार्यक्रमात फॉलो करु शकता.. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाक्षी हिने मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी 'हिरामंडी' या वेब सीरिजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.