
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

सोनाली कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीचे प्रत्येक लूक आडतात.

आता सोनालीने दिवाळीच्या मुहूर्तावर पिवळ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रा आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची. आता देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही सोनाली प्रचंड सुंदर दिसते.