
अभिनेत्री सोनम कपूर सध्या दिल्ली येथील तिच्या सासरी आहे. सोनम पहिल्यांदा वायू याच्यासोबत दिल्ली येथील घरी पोहोचली. घरी वायूचं भव्य स्वागत करण्यात आलं. मुलगा , सून आणि नातू यांच्या स्वागतासाठी आनंद आहुजा याच्या आई-वडिलांनी संपूर्ण घर सजवलं होतं.

सोनमने दिल्ली येथील घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये सोनम पती आनंद आहुजा, मुलगा वायू आणि सासू-सासऱ्यांसोबत दिसत आहे. नातू घरी आल्यामुळे आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंत स्पष्ट दिसत आहे.

सध्या सर्वत्र सोनम कपूर हिच्या भव्य घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सर्वत्र सोनमच्या पोस्टची चर्चा आहे. सोनमचं घर महागड्या वस्तूंनी सजवट करण्यात आली आहे.

वायूच्या स्वागतासाठी डायनिंग टेबलवर देखील फुलांची सजावट करण्यात आली. शिवाय वेगवेळ्या पद्धतीचे पदार्थ देखील बनवण्यात आले. सोनमच्या रॉयल घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सोनमने कॅप्शनमध्ये, 'दिल्ली आमच्या प्रेमळ वायूचं स्वागत करताना...' ज्या लोकांनी वायूचं स्वागत केलं आणि ज्यांनी पूर्ण सजावट केली त्यांचे देखील सोनमने आभार मानले आहेत.