
अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हे दोन्ही कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. आता गुरुवारी अक्षय आणि कतरिना प्रमोशनसाठी एकत्र आले.

यादरम्यान अक्षयने निळ्या रंगाचा सूट परिधान केला असून कतरिनाने पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. दोघंही एकत्र परफेक्ट दिसत होते.

यावेळी कतरिना खूपच सुंदर दिसत होती आणि चित्रपटाबद्दलचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

अक्षय आणि कतरिनाने फोटोशूट करताना एकत्र खूप मजा केली. अक्षय आणि कतरिनाने अनेकदा एकत्र काम केले आहे आणि दोघांमध्ये खूप घट्ट बॉन्ड आहे.

सूर्यवंशीबद्दल सांगायचं तर हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. याआधी हा चित्रपट 2 वेळा पुढे ढकलण्यात आला आहे.