
'सूर्यवंशी'ची टीम आता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच कतरिना कैफ आणि चित्रपट निर्माते रोहित शेट्टी फिल्मसिटीमध्ये स्पॉट झाले.

रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ आपल्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगच्या क्विझ रिअॅलिटी शो 'द बिग पिक्चर' च्या स्टेजवर पोहोचले. या चित्रपटात रणवीर सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

यावेळी कतरिना अतिशय पारंपारिक लूकमध्ये दिसली. कतरिनाने नारंगी रंगाची साडी परिधान केली आणि ती भरतकाम केलेल्या ब्लाउजसह तिने कॅरी केली होती. खुल्या केसांमध्ये कतरिनाने हा लूक अगदी साधा ठेवला होता, मात्र या साध्या लूकमध्येही ती खूप सुंदर दिसत होती.

त्याचवेळी रोहित शेट्टी रणवीर सिंगच्या शोमध्ये कुर्जा-पायजमामध्ये आला होता. यासोबत त्याने जवाहर कट जॅकेट कॅरी केलं होतं.

प्रमोशन दरम्यान कतरिना आणि रोहितला एकटे पाहून, अक्षय कुमार कुठे आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. याआधीही रोहित आणि कतरिना एका मराठी कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. अक्षय सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असे मानले जाते की त्याच्या वेळापत्रकातून मुक्त झाल्यानंतर तो चित्रपटाचे प्रमोशन करेल.