
लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री सरन्या ससी यांनी आज 9 ऑगस्टला केरळच्या तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

2012मध्ये त्यांना ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या मदतीनं ट्यूमर काढून टाकण्यात आला, मात्र तो वारंवार परत येत राहिला.

रिपोर्ट्सनुसार, त्यांनी सात शस्त्रक्रिया केल्या आणि शेवटच्या शस्त्रक्रियेमुळे तिला अर्धांगवायू झाला.

सरन्या यांनी 2006 मध्ये ‘अॅक्शन एंटरटेनर चाको रंदामन’ या चित्रपटातून पदार्पण केलं ज्यात कलाभवन मणी आणि मोहिनी मुख्य भूमिकेत होते.

त्या छोटा मुंबई (2007), थलाप्पावु (2008) आणि अन्नामारीया कलिप्पिलानू 92016) या चित्रपटांचा भाग होत्या. विविध मल्याळम डेली सोपमध्ये त्यांच्या चमकदार कामगिरीनं त्या प्रेक्षकांच्या आवडत्या होत्या.