
'देवों के देव महादेव' मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेली आर्या वोरा आता स्वत:चं युट्यूब चॅनल चालवतेय. कमीवेळेतच तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोवरचे प्रमाण आधिक झाले आहे.

आता नवरात्री निमित्त कलाकार आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

आता आर्यानं सुंदर गुजराती लूकमध्ये हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड पसंतीस उतरले आहेत.

यासोबतच तिने गरबा व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अभिनेत्री आर्या वोरा लोकप्रिय ब्लॉगर आहे. ती नेहमी उत्तम फॅशन आणि लाईफस्टाईल यावर अनेक गोष्टी तिच्या युट्यूबवर शेअर करत असते.