

या स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून ती मॉडेल सदाफ शंकर आहे. ती मूळची अफगाणिस्तानची आहे. ती प्रेमाच्या शोधात या शोमध्ये सहभागी झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून ती भारतात राहत आहे.

तिने स्वत: सांगितले की ती शिवभक्त आहे. हे ऐकून उपस्थित करण आणि तेथील सर्वजण आश्चर्यचकित झाले. ती 10 वर्षांपूर्वी मुंबईत आली. पण ती मुंबईकर नाही.

त्यावेळी करण तिला विचारतो की, तू मुस्लिम आणि अफगाणिस्तानची असून तुझे नाव शंकर का आहे? त्यावर ती म्हणाली की, ती भगवान शिव यांची मोठी भक्त आहे. त्यामुळे तिने तिच्या नावापुढे शंकर जोडले आहे.

तिच्या या उत्तराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यासोबतच तिचे अनेकांनी कौतुक केलं आणि तिथेच हर हर महादेवचा गजर केला. सदाफने तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ती प्रेमाच्या शोधात या शोमध्ये आली आहे. तिला भारतीय पुरुष, त्यांच्या त्वचेचा रंग खूप आवडतो. त्यासोबतच ती भारतीय जेवणाची देखील चाहती आहे.