
विजय देवेराकोंडा दक्षिण सिनेमाचा एक मोठा स्टार आहे. विजय आता लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

तो लाइगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

नुकतंच अर्जुन रेड्डी फेम अभिनेता विमानतळावर स्पॉट झाला. या दरम्यान तो शॉर्ट्स आणि ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसला आहे.

फोटोंमध्ये विजयचा स्वॅग स्पष्ट दिसतोय. त्याचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.

विजयसोबत त्याच्या बॉलिवूड डेब्यू फिल्म लाइगरमध्ये अनन्या पांडे झळकणार आहे. चित्रपटाचा पहिला लूक चाहत्यांसमोर सादर करण्यात आला आहे.