
बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही कायमच चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.

जॅकलिन फर्नांडिस हिची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आतापर्यंत अनेकदा चाैकशी झालीये. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीच्या जेलमध्ये आहे.

जेलमध्ये असूनही सुकेश चंद्रशेखर हा चर्चेत आहे. जेलमधून सतत जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी प्रेम पत्र हा सुकेश पाठवतो. नुकताच सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी एक पत्र पाठवले आहे.

जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर याने तिला वाढदिवसानिमित्त सुपर सरप्राईज देणार असल्याचे म्हटले आहे. इतेकच नाही तर वादा पूर्ण करणार असल्याचे सुकेश याने म्हटले.

माय लव्ह जॅकलिन म्हणत सुकेश याने आपल्या पत्राची सुरूवात केली. सुकेश चंद्रशेखर हा जरी जेलमध्ये असला तरीही तो कायमच जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो.