
हेरा फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला नकार दिला होता. चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याचे थेट अक्षय कुमार याने म्हटले होते.

अक्षय कुमार याने नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन याचे नाव चित्रपटासाठी चर्चेत होते. मात्र, परत अचानक शेवटी अक्षय कुमार याने चित्रपटाला होकार देत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा प्रोमोही शूट करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर डायरेक्टर फरहाद सामजीला चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी केली जातयं.

फरहाद सामजीला हेरा फेरी 3 मधून काढून टाकावे, असा ट्रेंडच सोशल मीडियावर बघायला मिळतोय. आता यावर शेवटी सुनील शेट्टीने मोठे भाष्य केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण झाले.

सुनील शेट्टी म्हणाले, आपले म्हणणे ठेवण्यासाठी ट्विटर एक चांगले ठिकाण आहे. प्रत्येकजण एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपले किस्मत, भाग्य आणि मेहनत घेऊन घेऊन येतो. मी कधीही फरहाद सामजी यांच्यासोबत काम केले नाहीये. पण ते चांगले लेखक असल्याने मे त्यांना ओळखतो. जर तुमच्या टिमला वाटते की, ते बरोबर आहेत तर तुम्हाला तुमच्या टिमसोबत चालावे लागते.