
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हललायं. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने रविवारी एका गोंडस बाळाला जन्म दिलायं.

सौंदर्या हिला मुलगा झालायं. याबाबतची माहिती स्वत: सौंदर्याने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केलीयं. चाहत्यांनी देखील सौंदर्याच्या या पोस्टवर आनंद व्यक्त केलायं.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सौंदर्याने तिचे पतीचे आणि बाळाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यावर आता चाहते कमेंट करत आहेत.

सौंदर्याने पोस्ट शेअर करताना लिहिले की, देवाच्या कृपेने आणि आई- वडिलांच्या आशीर्वादाने...वीर रजनीकांत वनंगमुडीचे स्वागत...विशेष म्हणजे यावेळी सौंदर्याने तिच्या बाळाच्या हाताचा एक फोटोही शेअर केलायं. फोटोमध्ये दिसते आहे की, बाळाने आईचे बोट धरले आहे.

सौंदर्याने बाळाचे नाव वीर रजनीकांत वनंगमुडी असे ठेवले आहे. गरोदरपणापासून सौंदर्याने तिचे अनेक फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते.