
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी 'तडप' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अहान शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ताराने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यांची खूप चर्चा होत आहे.

तारा सुतारियाने तिच्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ताराची बबली आणि हॉट स्टाईल पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये ताराचा बोल्डनेस अगदी उठून दिसत आहे.

ताराने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. यात तिने काळा चष्माही लावला आहे.

ताराचे हे फोटोशूट चाहत्यांना अक्षरशः घायाळ करत आहे. या पोस्टच्या कमेंट्समध्ये चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दर काही दिवसांनी तिचे फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये आपली उपस्थिती नोंदवत असते.

सध्या तारा तिच्या 'तडप' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत काम करत आहे.