
बाॅलिवूड फेम तेजस्वी प्रकाश गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेतील एक नाव आहे. नुकताच दुबईमध्ये आलिशान घर तेजस्वी आणि करण यांनी खरेदी केले.

दोन ते तीन महिन्यांपूर्वी तेजस्वीने गोव्यामध्येही स्वत: चे घर घेतले. एकता कपूरच्या नागिन या मालिकेमध्ये तेजस्वी सध्या काम करत असून यामध्ये ती महत्वाच्या भूमिकेत आहे.

तेजस्वीला खरी ओळख बिग बाॅसमधून मिळालीये. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेती आहे. बिग बाॅसमधून बाहेर आल्यावर लगेचच तेजस्वीला नागिन मालिकेत काम मिळाले.

तेजस्वी सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते. तेजस्वी फोटो आणि व्हिडीओ कायमच आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते.

नुकताच तेजस्वीने एक खास फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तेजस्वीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडताना दिसत आहेत.