
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिने गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र तेजस्वी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

छोट्या पडद्यावर कायम देसी लुक मध्ये प्रेक्षकांसमोर आलेली तेजस्वी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे. बिग बॉस सिझन 15 मधून तेजस्वी प्रेक्षकां समोर आली.

बिग बॉसच्यामुळे करण कुंद्र आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांच्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. आता अनेक ठिकाणी तेजस्वी हिला करण याच्यासोबत स्पॉट केलं जातं.

बिग बॉस शो संपल्यानंतरही तेजस्वी आणि करण कुंद्रा याचं नातं कायम आहे. तेजस्वी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ते दोघे एकमेकांसोबतही अनेकदा फोटो देखील शेअर करत असतात.

सोशल मीडियावर तेजस्वी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.