
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सतत चर्चेत असते. आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

नुकतंच तेजस्विनीनं हे सुंदर फोटो शेअर केले आणि लगेच या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

या फोटोत तेजस्विनीने काळ्या रंगाचा डीप नेक टॉप आणि फ्लोरल स्कर्ट परिधान केला आहे. यासोबतच तिने काळ्या रंगाच्या हिल्स मॅच केल्या आहेत.

या लूकमध्ये तेजस्विनी एकदम ‘कोरिअन’ मुलगी दिसत आहे. तिच्या या लूकला सोशल मीडियावर भरभरून लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळत आहेत.

आता तिचा हा सुंदर लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.