
जम्मू -काश्मीरमधील वातावरण उत्तम आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येथे येत असतात. काश्मीरमधील शहीद मकबूल शेरवानी चित्रपटाचं शूटिंगही सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री निहारिका रायजादा देखील चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये उपस्थित आहे.

निहारिका रायजादा युरोपमध्ये वाढली आहे, आता तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं आहे. तिने लक्झमबर्गमध्ये शिक्षण पूर्ण केलं. तिथे असताना तिने अमेरिकेतून अभिनयाचा कोर्स केला. निहारिका खूप सुंदर आहे आणि ती सध्या काश्मीरमध्ये चित्रपटाचं शूटिंग करत आहे.

निहारिका रायजादाने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला काश्मीर खूप आवडलं आणि येथील लोक खूप मैत्रीपूर्ण आहेत. तिने काश्मीरमध्ये शूटिंगसाठी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे आणि ती येथे आल्याबद्दल खूप आनंदी आहे.

निहारिका लवकरच अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'सूर्यवंशी' हा निहारिका रायजादाच्या जीवनाचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी ती काही मोठ्या मॉडेलिंग शोचा भाग राहिली आहे. तिचे ग्लॅमरस फोटोशूट देखील खूप चर्चेत आहेत. निहारिका रायजादाची कारकीर्द 2013 पासून सुरू झाली, जेव्हा तिने पहिल्यांदा 'दमाडोल' या बंगाली चित्रपटात काम केलं होतं.