
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि अँकर मिथुन रमेश याला केरळमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका दुर्मिळ आजाराची लागण अभिनेत्याला झाल्याचे सांगण्यात येतंय.

अभिनेता मिथुन रमेश हा बेल्स पाल्सी या आजाराने त्रस्त आहे. हा आजार एक प्रकारचा अर्धांगवायूसारखाच आहे. यामध्ये चेहऱ्याचा एक भाग काहीच काम करत नाही.

अभिनेता मिथुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आजाराची माहिती दिली असून आरोग्याबाबत अपडेटही दिले आहे. मिथुन रमेश याला एक डोळा बंद करता येत नाहीये.

मिथुन रमेश याची पत्नी लक्ष्मी मेनन हिने अभिनेत्याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. अनंतपुरी रुग्णालयात सध्या अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत.

अभिनेत्याच्या तब्येतीविषयी माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. मनोज रमेश याला यापूर्वी 2021 मध्ये चेहऱ्याचा अर्धांगवायू झाला होता.