
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नुकताच भारतामध्ये दाखल झालीये. विशेष म्हणजे यावेळी आपल्या कुटुंबासोबत प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आलीये. प्रियांका चोप्रा हिचे विमानतळावरील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने काही गंभीर आरोप हे बाॅलिवूडवर केले होते. यावेळी आपल्याला कशाप्रकारे बाॅलिवूडमध्ये एका कोपऱ्यात टाकले जाऊ लागले हे सांगताना प्रियांका चोप्रा दिसली होती.

प्रियांका चोप्रा ही अचानक भारतामध्ये का आली? यावर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा हिची बहीण परिणीती चोप्रा ही प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या देखील चर्चा आहेत.

परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठीच कुटुंबासोबत प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. राघव चड्ढा याच्यासोबत परिणीती चोप्रा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अशी एक चर्चा आहे की, परिणीती चोप्रा ही एप्रिलमध्येच लग्न करणार आहे. खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.