
बाॅलिवूड अभिनेते हे कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात. फिटनेसमध्ये तरूण मुलांना लाजवेल असा काही बाॅलिवूड अभिनेत्यांचा फिटनेस हा बघायला मिळतो.

बाॅलिवूड अभिनेते अनिल कपूर हे 66 वयाचे असून ते या वयातही अत्यंत फिट आहेत. बऱ्याच वेळा अनिल कपूर हे सोशल मीडियावर त्यांच्या व्यायामाचे फोटो शेअर करताना दिसतात.

बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा 57 वयाचा असून अजूनही सलमान खान तरूण दिसतो. सलमान खान याने काही दिवसांपूर्वीच जीममधील काही फोटो शेअर केले होते.

बाॅलिवूड अभिनेते सुनील शेट्टी हे 61 वयाचे असून जबरदस्त फिटनेसमध्ये दिसतात. नेहमीच आयपीएल मॅच बघण्यासाठी मैदानात सुनील शेट्टी उपस्थित असतात.

मिलिंद सोमन देखील आपल्या फिटनेसकडे कायमच लक्ष देतात. बऱ्याच वेळा ते समुद्रकिनारी व्यायाम करतात. मिलिंद सोमन 57 वयाचे आहेत.