
अनेकदा बाॅलिवूड स्टार हे मंदिरांमध्ये जाताना दिसतात. इतकेच नाही तर अनेक बाॅलिवूड स्टार हे महादेवाचे मोठे भक्त देखील आहेत. अनेकांनी आपल्या अंगावर थेट महादेवाचे टॅटू देखील काढले आहेत.

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा महादेवाचा अत्यंत मोठा भक्त असून अजय देवगण याने छातीवर त्याने महादेवाचा टॅटू बनवून घेतलाय. अनेकदा तो फोटोमध्ये देखील दिसतो.

बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त हा देखील महादेवाचा मोठा भक्त आहे. मुळात म्हणजे संजय दत्त याने अंगावर अनेक टॅटू बनवून घेतले आहेत. संजय दत्त याच्या डाव्या हातावर महादेवाचा टॅटू आहे.

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक हिने देखील पाठिवर महादेवाचा टॅटू तयार करून घेतलाय. अनेक फोटोंमध्ये कविता काैशिक हिचा हा टॅटू दिसतो. काही वर्षांपूर्वी कविता ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती.

बाॅलिवूड अभिनेता रोनित रॉय याने देखील आपल्या हातावर महादेवाचा टॅटू बनवून घेतलाय. मोठ्या अक्षरात ओम लिहिले असून त्रिशूल देखील या टॅटूमध्ये दिसतो.