
मनोरमा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नाव. त्यांनी बालकलाकारापासून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि शेवटी त्यांची खलनायकाची भूमिका देखील खूप चांगल्या प्रकारे केली. सीता आणि गीता हे त्यांचे अत्यंत फेमस नाव.

मनोरमा यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. मनोरमा यांनी जवळपास 160 चित्रपटांमध्ये काम केले.

सुरुवातीला त्या अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये दिसल्या. पण नंतर त्यांनी खलनायक आणि कॉमिकची भूमिका साकारली. मनोरमा यांनी हाफ टिकट, दस लाख, झनक झनक पायल बजे, मुझे जीने दो, महबूब की मेहंदी, बॉम्बे टू गोवायासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

2007 मध्ये मनोरमा यांना स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या पण नंतर त्यांची तब्येत अधिक खालावली आणि 15 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांचे निधन झाले.

मनोरमा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांचे लग्न राजन हकसर यांच्याशी झाले होते आणि तेही तेव्हा अभिनेता होते.