
‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती डिमरी हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘ॲनिमल’ सिनेमात साकारलेल्या भूमिकाला चाहत्यांकडून प्रेम मिळत असल्यामुळे अभिनेत्री देखील आनंदी आहे.

सिनेमात अभिनेत्रीची भूमिका छोटी असली तरी चाहत्यांच्या मनात घर करुन गेली आहे. सिनेमातील रणबीर आणि तृप्ती यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. सिनेमासाठी रणबीर कपूर आणि तृप्ती यांनी मोठी रक्कम घेतली आहे.

रिपोर्टनुसार, ‘ॲनिमल’ सिनेमासाठी अभिनेता रणबीर कपूर याने 35 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर तृप्ती हिने 40 लाख रुपये मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली.

‘ॲनिमल’ सिनेमात रणबीर आणि तृप्ती यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. सीनवरून अनेक वाद देखील निर्माण झाले. सोशल मीडियावर देखील रणबीर आणि तृप्ती यांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे.

सिनेमाने प्रदर्शनानंतर 9 दिवसांत तब्बल 650 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. रिपोर्टनुसार, 9 दिवसांत सिनेमाने जगभरात तब्बल 660 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमात रणबीर, तृप्ती यांच्यासोबत अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.