
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखी जाते. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळेच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते.

कोणीही काहीही टिका केली तरीही उर्फी जावेद हिला काहीच फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आता नुकताच उर्फी जावेद ही हटके स्टाईलमध्ये दिसली आहे. मात्र, उर्फी जावेद हिला हा लूक चाहत्यांना अजिबात आवडल्याचे दिसत नाहीये. अनेकांनी या लूकमुळे तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.

उर्फी जावेद हिने ऑल ब्लॅक ट्रांसपेरेंट स्किन टाइट ड्रेस घातला आहे. मात्र, या ड्रेसमुळे अनेकांनी उर्फी जावेद हिची खिल्ली उडवण्यास सुरूवात केलीये. उर्फी जावेद हिचा ड्रेस पाहून ट्रोलर्सचा पारा चढला आहे. आता याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
