
कलर्स टीव्हीचा बहुचर्चित रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 12 ला पहिला फायनलिस्ट अखेर मिळालायं. गेल्या काही दिवसांपासून खतरों के खिलाडी शो टिआरपीमध्ये टाॅपला आहे.

खतरों के खिलाडीच्या 12 व्या सीझनमध्ये फिनाले टास्कचे तिकीट जाहीर करण्यात आले. त्यानंतर रुबिना दिलैकची तब्येत खराब असल्याने रूबिनाने टास्क केला नाही.

फैजल शेख आणि तुषार कालिया यांच्यातील टास्कनंतर रोहित शेट्टीने फायनलिस्टची घोषणा केलीयं. तुषार आणि फैजू दोघेही प्रत्येक टास्क भारी करतात.

निशांत भट आणि राजीव यांनीही रुबिनाचे प्रॉक्सी म्हणून टास्क करण्यास नकार दिला. कनिका मानने देखील टास्क करण्यास नकार दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केलीयं. लास्टच्या टास्कमधून फैजूला बाहेर पडावे लागले.

कोरिओग्राफर तुषार कालियाने खतरों के खिलाडीच्या फिनालेचे तिकीट जिंकले आहे. रोहित शेट्टीने तुषारच्या नावाची घोषना सर्वात शेवटी केलीयं.